स्वत:च्या मापाची जीन्स न मिळाल्याने सुरू केली कंपनी
-----------------
डॉरिस आणि डोनल्ड फिशर यांनी १९६९ मध्ये वस्त्र दालन शृंखला सुरू केली होती. ‘गॅप’ हा त्यांचा ब्रँड जगप्रसिद्ध आहे. डोनल्ड यांनी एक जुने हॉटेल खरेदी केले. यातील एक दालन त्यांनी जीन्स शोरूमसाठी किरायाने दिले. येथून डोनल्ड यांनी जीन्स खरेदी केली. त्यांना त्याचे फिटिंग बसेना. त्यांना ३१ इंची मापाची जीन्स हवी होती. मात्र ३० किंवा ३२ इंची जीन्स उपलब्ध होत्या. त्यांनी संपूर्ण सॅनफ्रान्सिस्कोमध्ये स्वत:साठी फिटिंगची जीन्स शोधली. मात्र त्यांना ती मिळाली नाही. कोठेही सर्वच मापाच्या जीन्स उपलब्ध नव्हत्या. डोनल्ड आणि डॉरिस फिशरसाठी ही बाब विशेष ठरली. बाजारातील ही मागणी त्यांनी आेळखली. ६३ हजार डॉलर्स गुंतवणूक करून त्यांनी पहिले दालन सुरू केले. येथे प्रत्येक मापाच्या जीन्स उपलब्ध होत्या. कोणालाही असुविधा होऊ नये अशी भूमिका होती. या दालनात जीन्स आणि म्युझिक रेकॉर्ड््स विकले जात. डोनल्ड यांच्या मते याचे नाव ‘पँट्स अँड डिस्क’ ठेवले जावे. मात्र डॉरिसने याला ‘जनरेशन गॅप’ नाव सुचवले. पुढे ते केवळ ‘गॅप’ झाले.
फोर्ब्जच्या यादीत डॉरिस यांच्या नावाची नोंद आहे. जगातील स्वयंप्रेरित यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये आज गॅपशिवाय आेल्डनेव्ही, पेपरलाइम कंपन्याही सामील आहेत. डॉरिस २००३ पर्यंत कंपनीच्या विक्रीप्रमुख होत्या. २००९ पर्यंत कंपनीच्या संचालक मंडळात होत्या. कंपनीचा एकूण निव्वळ नफा अंदाजे १६ अब्ज डॉलर्स सांगण्यात आलाय. डॉरिस यांची व्यक्तिगत संपत्ती २.७ अब्ज डॉलर्स आहे.

डॉरिस-डोनल्ड यांनी अचानक हा बिझनेस स्थापन केला. डोनल्डचे वय त्या वेळी ४० होते. त्यांनी वडिलांच्या कंपनीतून करिअर सुरू केले होते. प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचे काम ते करत. सत्तरच्या दशकात किशोरवयीनांच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा संपूर्ण फायदा या ब्रँडला मिळाला. त्यांनी दुसरे दालन १९७२ मध्ये कॅलिफोर्नियात सुरू केले. याच्या यशानंतर १९७४ मध्ये कंपनीने आपली वस्त्रश्रेणी व अॅक्सेसरीत उत्पादन सुरू केले. १९९१ पर्यंत कंपनीने लिवाइसच्या जीन्स विकल्या. दोन्ही ब्रँड दीर्घकाळ भागीदारीत काम करत होते. डोनल्ड व डॉरिस फिशरचा जन्म सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झाला. दोघांच्या कुटुंबात स्नेह होता. डॉरिसने स्टेनफोर्ड विद्यापीठातून पदवी घेतली. अर्थशास्त्रात पदवी घेणाऱ्या क्वचित महिलांपैकी त्या होत्या. ‘डॉन’ने घेतलेल्या मुलाखतीत डोनल्डने सांगितले होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एका गिरणीत काम केले. नंतर बांधकाम व्यवसायात भाग्य आजमावले. डिझायनिंगमध्ये ते विशेषज्ञ होते. ते आर्किटेक्टसोबत डिझायनिंग आणि स्वत:च्या कल्पनांवर काम करत. फिशर दांपत्याने १९७७ मध्ये गॅप फाउंडेशन स्थापन केली. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कामात ‘नॉलेज इज पॉवर प्रोग्राम’ आहे. हा कॉलेज आणि शालेय मुलांसाठीचा ऑनलाइन प्रकल्प आहे. त्यांच्या शाळांमध्ये कमी उत्पन्न गटातील ३२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिकतात. त्यांचे आर्ट कलेक्शनदेखील प्रसिद्ध आहे. त्यांच्या संग्रही ११०० पेक्षा अधिक आर्टवर्क आहे. सॅनफ्रान्सिस्को म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट नावाने ते आेळखले जाते. याला अमेरिकेतील सर्वात मोठे आर्ट म्युझियम म्हणून आेळखले जाते. आर्ट कलेक्शनच्या सुरुवातीविषयी डॉरिस सांगतात की त्यांचा कलेशी कधी संपर्क नव्हता. त्यांचे वडील वकील होते. ऑफिस डिझायनिंग आणि सजावट करण्याचे काम हाती घेतल्यावर यात आवड विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले. घरात कलात्मक वस्तू होत्या, पण त्या फार विशेष नव्हत्या. त्यामुळे मॉडर्न आर्ट विषयी उत्सुकता पूर्वी नव्हती मात्र नंतर ती वाढत गेली.
Source : DivyaMarathi - http://bit.ly/2hPxnXn
#GAP #jeans
Source : DivyaMarathi - http://bit.ly/2hPxnXn
#GAP #jeans
No comments:
Post a Comment